For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुग्णालयाच्या मनमानी कारभाराला चाप, हॉस्पिटलच्या तक्रारींसाठी लवकरच मोबाईल अॅप

05:36 PM May 04, 2025 IST | Snehal Patil
रुग्णालयाच्या मनमानी कारभाराला चाप  हॉस्पिटलच्या तक्रारींसाठी लवकरच मोबाईल अॅप
Advertisement

हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराला चाप बसण्यासाठी नवीन मोबाईल अॅप विकसित केले जाणार 

Advertisement

कोल्हापूर : गोरगरिबांना सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावे, यासाठी शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराला चाप बसण्यासाठी नवीन मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. याद्वारे रुग्ण व नातेवाईकांच्या तक्रारी थेट आरोग्य विभागाकडे नोंद केल्या जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

हॉटेल सयाजी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मंत्री आबिटकर म्हणाले, शासकीय यंत्रणेने नियंत्रण ठेवल्यास आपोआप हॉस्पिटलचा मनमानी कारभार थांबेल. गेल्या पाच वर्षात 1 हजार 7 तक्रारी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात आल्या होत्या. हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता नवीन मोबाईल अॅपद्वारे नागरिकांना मिळणार आहे. कोल्हापूरमध्ये चार हॉस्पिटलवर कारवाई महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बदल करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पुढील एक महिन्यात या योजनेतील आर्थिक निधीमध्ये वाढ केली जाणार आहे.

Advertisement

योजनेत रुग्णांकडून पैसे घ्यायचे नसताना काही हॉस्पिटल पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. अशा तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरमध्ये चार हॉस्पिटलवर अशी कारवाई झाली असून राज्यात देखील ही कारवाई सुरू होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. निधीसाठी कसरत मंत्री संजय शिरसाट यांच्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे. बजेटमध्य इतर विभागांना निधीची उपलब्धता व्हायला हवी होती ती झालेली नाही. यामुळे थोडीशी अडचण झाली आहे.

पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली आहे, आता गाडी रुळावर येईल. लाडकी बहिणीसह सर्वच योजनांसाठी पुढच्या टप्प्यात निधीची उपलब्धता होईल, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. समन्वयाने लढलो तर राज्याप्रमाणे जिह्यातही सत्ता राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जिह्यात देखील सर्वच निवडणुका एकत्रित लढवणे अपेक्षित आहे. सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही एकमेकांच्या समन्वयाने लढलो तर राज्याप्रमाणे जिह्यातही सत्ता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.