For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परुळे उपसरपंच पदी प्राजक्ता पाटकर बिनविरोध

परुळे उपसरपंच पदी प्राजक्ता पाटकर बिनविरोध
Advertisement

परूळे : प्रतिनिधी

Advertisement

परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. प्राजक्ता प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत उपसरपंच संजय दूधवडकर यांनी राजीनामा दिला त्यानंतर सदर पद रिक्त होते. यावेळी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली . यावेळी प्राजक्ता पाटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असे जाहीर करण्यात आले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन केले. यावेळी मच्छिमार संघटना अध्यक्ष वसंत तांडेल, वेंगुर्ले खरेदी विक्री संघाचे चेअरमन अविनाश केळजी , कुशेवाडा सरपंच निलेश सामंत ,व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, सरपंच प्रणिती आंबडपालकर, सदस्य प्रदीप प्रभू संजय दूधवडकर, अभय परुळेकर ,तन्वी दूधवडकर ,नमिता परुळेकर, सीमा सावंत, रश्मी सामंत ,सुनात राऊळ यासह माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू ,सदस्य सुनील चव्हाण ,बाळकृष्ण परुळेकर, भालचंद्र सारंग, शांताराम पेडणेकर ,दामोदर पाटकर यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया राबविली.

Advertisement
Advertisement
Tags :

.