प्राजक्ता कोळी मराठी चित्रपटात
सोशल मीडियावरील प्रसिद्ध युट्यूबर आणि इन्फ्लुएंसर प्राजक्ता कोळीने ‘मोस्टलीइनसेन’ नावाने 2015 मध्ये युट्यूबवर सुरुवात केली होती. दैनंदिन जीवनावर आधारित विनोदी व्हिडिओंमुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने अभिनयाकडे वळत नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच’ वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली. यानंतर बॉलिवूडमध्ये ‘जुग जुग जियो’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले हेते. प्राजक्ता आता लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमेने स्वत:चा आगामी चित्रपट ‘क्रांतिज्योति विद्यालय-मराठी माध्यम’ची घोषणा केली आहे. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजनक भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे चित्रिकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात पार पडले आहे. या मराठी चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह प्राजक्ता कोळीही दिसून येणार आहे. क्षिती जोगच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेख आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेने पेल आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार आहे.