For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञानंद, डी गुकेश यांच्या लढती अनिर्णीत

06:10 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञानंद  डी गुकेश यांच्या लढती अनिर्णीत
Advertisement

वृत्तसंस्था/ बुचारेस्ट, रोमानिया

Advertisement

येथे सुरू असलेल्या सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या व उपांत्य फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला तर वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर डी गुकेशनेही हॉलंडच्या अनिश गिरीविरुद्धचा सामना अनिर्णीत राखला.

या स्पर्धेत चौथ्यांदा एकही सामना निकाली ठरला नाही. पाचही लढती अनिर्णीत राहिल्याने प्रत्येक खेळाडूला गुण विभागून मिळाले. त्यामुळे कारुआनाची अर्ध्या गुणाची कायम राहिर्लीं. दहा खेळाडूंच्या सहभागाची ही स्पर्धा राऊंडरॉबिन पद्धतीने खेळविली जात असून अद्याप एक फेरी बाकी आहे. ग्रँड चेस टूरचा ही स्पर्धा एक भाग आहे.

Advertisement

आठ सामन्यात 5 गुण घेत कारुआना आघाडीवर असून प्रज्ञानंद, डी गुकेश, फ्रान्सचा अलीरेझा फिरौझा त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहेत. रशियाचा इयान नेपोमनियाची व फ्रान्सचा मॅक्झिम व्हॉशियर लेग्रेव्ह 4 गुणांसह पाचव्या स्थानावर तर अमेरिकेचा वेस्ली सो, उझ्बेकिस्तानचा नॉडिरबेक अब्दुसत्तारोव्ह व अनिश गिरी  यांचे प्रत्येकी 3.5 गुण झाले आहेत. रोमानियाचा डीक बॉग्डन डॅनियल तळाच्या स्थानावर असून तिचे 3 गुण झाले आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 350000 डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

इंग्लिश ओपनिंगने सुरू झालेली प्रज्ञानंद व कारुआना यांच्यातील लढत 31 चालीत बरोबरीत राहिली. काळ्या मोहरांनी खेळणाऱ्या गिरीने गुकेशविरुद्ध निम्झो इंडियन बचावाचा अवलंब केला. गिरीने धोका न पत्करण्याचे धोरण ठेवल्याने ही लढत 30 चालीत बरोबरीत सुटली. वेस्ली सो-व्हॉशियर लेग्रेव्ह यांच्यातील इटालियन ओपनिंगची लढतही अनिर्णीत राहिली.

आठव्या फेरीचे निकाल : अलीरेझा फिरोझा ब.वि. नेपोमनियाची, कारुआना ब.वि. आर. प्रज्ञानंद, अब्दुसत्तारोव्ह ब.वि. बॉग्डन डॅनियल, डी. गुकेश ब.वि. अनिश गिरी, व्हॉशियर लेग्रेव्ह ब.वि. वेस्ली सो.

Advertisement
Tags :

.