For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘सूर्या’ चित्रपटात प्रज्ञा जायस्वाल

06:51 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सूर्या’ चित्रपटात प्रज्ञा जायस्वाल
Advertisement

सनी देओलच्या चित्रपटाचे पोस्टर जारी

Advertisement

बॉलिवूड अभिनेता सनी देओल स्वत:चा आगामी चित्रपट ‘सूर्या : अंत से आरंभ तक’मध्ये एका नव्या अवतारात दिसून येणार आहे. अभिनेत्याने याचे पोस्टर जारी केले आहे. फर्स्ट लुक पोस्टरमध्ये तो अत्यंत गंभीर आणि आक्रमक शैलीत दिसून येत आहे. पोस्टरमध्ये सनी वृद्ध भूमिकेत दिसून येत असून यात तो धूम्रपान करत असून त्याचा लुक आक्रमक आहे. ‘भूतकाळ अन् वर्तमानात गुंतलेल्या सत्याचा तो शोध घेतो’ अशी कॅप्शन देत सनीने हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्याळम फिल्ममेकर एम. पद्मकुमार यांनी केले आहे. हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे.

2018 मध्ये प्रदर्शित प्रसिद्ध मल्याळी चित्रपट ‘जोसेफ’चा हा हिंदी रिमेक आहे. सनी देओल यात एक निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. यात तो एका अशा तपासात अडकून पडतो, ज्यामुळे त्याला गुन्हे अन् स्वत:च्या भूतकाळातील रहस्यांना सामोरे जावे लागते. चित्रपटात न्याय, नैतिक दुविधा आणि कधीच समोर न आलेल्या सत्याचे परिणम यासारख्या विषयांना दाखविण्यात आले आहे.  या चित्रपटात प्रज्ञा जायस्वाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत रवि किशन, जिस्शू सेनगुप्ता, टीनू आनंद, मनीष वाधवा आणि तनुश्री चक्रवर्ती, रोहित तिवारी आणि अनूप त्रिवेदी हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती दीपक मुकुट, हेमंत मुकुट आणि लोकेश मुकुट यांनी एमएम मूव्हीज बॅनर अंतर्गत केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.