For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुनियर लाईन फॉलोविंग रोबोट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रज्ञा हायस्कूल तृतीय

12:55 PM Feb 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जुनियर लाईन फॉलोविंग रोबोट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रज्ञा हायस्कूल तृतीय
Advertisement

सातार्डा गावचा सुपुत्र मयंक कवठणकरचा संघात होता समावेश

Advertisement

सातार्डा -
यु. ए. ई शारजा येथे झालेल्या वर्ल्ड स्टेम अँड रोबोटिक्स ऑलिम्पियाड रोबोटिक्स चॅम्पियनशिप यु. ए. ई 2026 अंतर्गत झालेल्या जुनियर लाईन फॉलोविंग रोबोट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देवसू - गोवा येथील प्रज्ञा हायस्कूलच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले आहे. उल्लेखनीय यश संपादन केलेल्या प्रज्ञा हायस्कूलच्या संघामध्ये सातार्डा गावचा सुपुत्र मयंक संदीप कवठणकर याचा समावेश होता.गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार प्रविण आर्लेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.मंत्री शिरोडकर यांनी डब्लू. एस .आर ओ रोबोटिक्स विजेत्या खेळाडूंना पन्नास हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव केला प्रज्ञा हायस्कूलचे विद्यार्थी मयंक संदीप कवठणकर, मनिष महादेव गवंडी, निर्भय मनोज टळकर यांनी नेत्रदीपक यश संपादन करून भारतात आल्यानंतर त्यांचे दाबोळी विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.यशस्वी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षक प्रसाद गडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.