For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राग मास्टर्स बुद्धिबळ : भारतीय त्रिकुटाच्या लढती बरोबरीत

06:41 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्राग मास्टर्स बुद्धिबळ   भारतीय त्रिकुटाच्या लढती बरोबरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ प्राग

Advertisement

आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश आणि विदित गुजराथी या भारतीय त्रिकुटाला येथे चालू असलेल्या प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. दोन लागोपाठ पराभवानंतर प्रज्ञानंदने स्वत:ला काही प्रमाणात सावरले आणि स्थानिक खेळाडू नुगेन थाई दाई व्हॅनबरोबरची लढत बरोबरीत सोडविण्यापूर्वी चांगला खेळ केला.

गुकेशने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हला कोणतीही संधी दिली नाही आणि बरोबरीवर सामना सोडविण्यास भाग पाडले, तर गुजराथी पोलंडच्या मॅट्यूझ बार्टेलविरुद्ध फारशी प्रगती करू शकला नाही. दिवसभरात कोणताही निर्णायक निकाल दिसला नाही. कारण उर्वरित दोन सामने देखील बरोबरीत सुटले. इराणच्या परहम माघसुदलूचा झेक प्रजासत्ताकच्या डेव्हिड नवाराविरुद्धचा आणि रुमानियाच्या रिचर्ड रॅपर्टचा जर्मन व्हिन्सेंट कीमरविऊद्धचा सामना बरोबरीत संपला.

Advertisement

त्यामुळे शुक्रवारी जी परिस्थिती होती ती बदललेली नाही. अब्दत्तारोव्ह आणि माघसुदलू हे आता तीन गुणांनिशी आघाडीवर आहेत. गुकेश आणि रॅपर्ट अडीच गुणांनिशी मागोमाग आहेत, तर गुजराथी दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. प्रज्ञानंद, नवारा, दाई व्हॅन आणि कीमरपेक्षा गुजराथी अर्ध्या गुणाने पुढे आहेत. तर बार्टेलने एक गुण मिळविलेला असला, तरी तो गुणतालिकेत तळाशी आहे.

दरम्यान, जागतिक क्रमवारीतील अव्वल भारतीय ठरण्यासाठीची शर्यत चालूच असून विश्वनाथन आनंदने पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. कारण अर्जुन एरिगासीने चीनमधील शेन्झेन मास्टर्समध्ये झियांगझी बू याच्याविऊद्धचा दुसऱ्या फेरीचा सामना गमावला.

Advertisement
Tags :

.