For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञानंदने गमावल्या संधी लाग्रेव्हने रोखले बरोबरीत

06:27 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञानंदने गमावल्या संधी लाग्रेव्हने रोखले बरोबरीत
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बुखारेस्ट : येथे झालेल्या सुपर चेस क्लासिकच्या शेवटून दुसऱ्या फेरीच्या अखेरीस विजेतेपदाची शर्यत अधिकच चुरशीची झाली असताना भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने विजयाच्या काही संधी चुकवल्या आणि फ्रान्सच्या मॅक्सिम वाशियर-लाग्रेव्हने त्यांना बरोबरीत रोखले.

रोमांचक ठरलेल्या या दिवशी आदल्या रात्री आघाडीवर असलेला अमेरिकेचा फॅबियानो काऊआना आणि जर्मनीचा व्हिन्सेंट कींमर यांच्यातील सामना बरोबरीत संपला, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हानवीर उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने डच खेळाडू जॉर्डन व्हॅन फोरेस्टवर सलग दुसरा विजय नोंदवला. दोन डच ग्रँडमास्टर्सना हा दिवस लक्षात ठेवायला आवडणार नाही. कारण अनिश गिरी रोमानियाचा सर्वांत कमी मानांकित खेळाडू डेक बोगदान-डॅनियलकडून पराभूत झाला.

Advertisement

स्पर्धेतून यापूर्वीच फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाने माघार घेतल्यामुळे अमेरिकेच्या वेस्ली सो याला पुढे चाल मिळाली. केवळ शेवटची फेरी शिल्लक असताना विजेतेपदाची शर्यत अधिकच तीव्र झाली असून तब्बल पाच खेळाडू शर्यतीत आहेत. कीमर आणि काऊआना या दोघांचे प्रत्येकी पाच गुण झाले असून ते आघाडीवर आहेत. त्यामुळे प्ले-ऑफ होण्याची दाट शक्यता आहे. सिंदारोव्ह, वेस्ली आणि फोरेस्ट प्रत्येकी 4.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, तर प्रज्ञानंद आता गिरी आणि वाशियर-लाग्रेव्ह यांच्यासोबत प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.

Advertisement

.