प्रज्ञानंदने विजयाची संधी गमावली, कीमरविरुद्ध बरोबरी
वृत्तसंस्था, सेंट लुईस : येथे सुरू असलेल्या ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरविऊद्ध त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. प्रज्ञानंदने विजयाची संधी गमावली आणि जिद्दी कीमरने कठीण परिस्थितीतून सावरत सामना बरोबरीत सोडवला.
एकीकडे अमेरिकेचा वेस्ली सो याने आपलाच देशबांधव फॅबियानो काऊआनाविऊद्ध सुरक्षित खेळण्याचे धोरण स्वीकारले आणि पांढऱ्या मोहऱ्यांसह सहजपणे सामना बरोबरीत सोडवला. दुसरीकडे प्रज्ञानंद मात्र पूर्ण लयीत खेळत होता आणि प्रतिस्पर्ध्याकडे असलेल्या सुऊवातीच्या खास अनुकूलतेलाही त्याने जोरदार टक्कर दिली. सातत्याने प्रगती करणाऱ्या कीमरला सुऊवातीला परिस्थितीचा अंदाज आला नाही. जेव्हा खेळातील गुंतागुंत संपली, तेव्हा आपण अत्यंत कठीण अशा खेळाच्या अंतिम टप्प्यात अडकल्याचे त्याला जाणवले.
एक लढाऊ खेळाडू म्हणून कीमरने हार मानली नाही आणि प्रज्ञानंदच्या प्रत्येक चालीला चोख प्रत्युत्तर दिले. अखेरीस भारतीय खेळाडूने एक मोठी चूक केली आणि विजयाची संधी हातातून निसटली. या स्पर्धेचे एकूण बक्षीस मूल्य 4,50,000 डॉलर्स इतके आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथे गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेच्या तुलनेत यावर्षी बक्षीस रकमेत 1,00,000 डॉलर्सची वाढ करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी या टूरची संकल्पना मांडली गेली होती त्याच सेंट लुईस शहरात ही स्पर्धा कायम ठेवण्याचा निर्णय आयोजकांनी योग्यरीत्या घेतला आहे.
खेळाडू या स्पर्धेची सुऊवात ’‘क्लासिकल’ प्रकारातील दोन सामन्यांनी करतील. यात प्रत्येक विजयासाठी 6 गुण मिळतील, तर सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 3 गुण दिले जातील. दोन ‘क्लासिकल’ सामन्यांनंतर खेळाडूंना खेळाची शैली बदलावी लागेल आणि दुसऱ्याच दिवशी ‘रॅपिड’ व ’ब्लिट्झ’ सामने खेळावे लागतील. ‘रॅपिड’ प्रकारात, प्रत्येक विजयासाठी 4 गुण मिळतील आणि सामना बरोबरीत सुटल्यास हे गुण दोन्ही खेळाडूंमध्ये विभागले जातील. दोन ‘रॅपिड’ सामन्यांनंतर चार‘ब्लिट्झ’ सामने होतील. यात प्रत्येक विजयासाठी 2 गुण मिळतील आणि सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 1 गुण मिळेल.