प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूर जिंकून रचला इतिहास
वृत्तसंस्था : भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद रमेशबाबूने ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाविऊद्ध शानदार पुनरागमन करत अंतिम सामना जिंकला आणि त्यासोबतच सेंट लुईस येथे आपले पहिले ग्रँड चेस टूर फायनल्सचे विजेतेपद आणि 2 लाख डॉलर्सचे पटकावले.
या विजयासह प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे. या भारतीय ग्रँडमास्टरने दिवसाची सुऊवात काऊआनापेक्षा सहा गुणांनी मागे राहून केली होती, परंतु त्याने लवकरच सामन्याचे चित्र पालटले आणि दोन्ही रॅपिड गेम्स जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर त्याने ब्लिट्झमध्ये काऊआनाला बरोबरीत रोखले आणि 15-13 च्या अंतिम गुणसंख्येने विजेतेपद मिळवले.
पहिल्या ब्लिट्झ गेममध्ये प्रज्ञानंदकडे जिंकण्याची संधी होती, परंतु वेळेच्या गडबडीत त्याने चूक केली. त्याची स्थिती झपाट्याने खालावली, परंतु काऊआनाला त्याचा फायदा घेता आला नाही आणि अखेरीस सामना बरोबरीत संपला. दुसरीकडे, वेस्ली सो यानेही ग्रँडमास्टर व्हिन्सेंट कीमरविऊद्धच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पुनरागमन केले. रॅपिड प्रकारात दोन्ही खेळाडूंनी एक-एक विजय मिळवला, परंतु सोने ब्लिट्झ प्रकारात वर्चस्व गाजवले आणि चारही गेम्स जिंकून एक गेम शिल्लक असतानाच सामना आपल्या नावावर केला. त्याने 18-12 असा विजय मिळवला.
यापूर्वी बुधवारी प्रज्ञानंदने आपला दुसरा क्लासिकल गेम बरोबरीत सोडवला होता, परंतु त्याचा प्रतिस्पर्धी काऊआना सहा गुणांनी आघाडीवर होता. हा तऊण भारतीय ग्रँडमास्टर आपल्या पहिल्या क्लासिकल गेममध्यश काऊआनाकडून 6-0 ने हरला होता. परंतु दुसऱ्या क्लासिकल गेममध्ये 3-3 अशी बरोबरी साधताना त्याने चांगली कामगिरी केली.