प्रज्ञानंद सिंदारोव्हकडून पराभूत, तिसऱ्या स्थानी घसरण
वृत्तसंस्था/पाफोस, सायप्रस
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला येथे झालेल्या फिडे कँडिडेट्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हकडून पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना झालेला हा पराभव प्रज्ञानंदसाठी महागात पडू शकतो. त्याने डच ग्रँडमास्टर अनिश गिरीला पराभूत करून आपल्या मोहिमेची शानदार सुऊवात केली होती.
या पराभवानंतर हा भारतीय खेळाडू 1.5 गुणांवर पोहोचला असून त्याला तातडीने सावरण्याची गरज आहे. सिंदारोव्हच्या व्यतिरिक्त प्रबळ दावेदार असलेला अमेरिकी ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाने पहिल्या तीन फेऱ्यांमधील सर्वांत विचित्र सामन्यांपैकी एकामध्ये चीनच्या वेई यीला पराभूत केले, ज्यामुळे काऊआना आणि सिंदारोव्ह प्रत्येकी 2.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. त्यांच्यापाठोपाठ प्रज्ञानंद 1.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर मॅथियास ब्लूबाम, आंद्रे एसिपेन्को, हिकारू नाकामुरा आणि गिन प्रत्येकी एका गुणासह चौथ्या स्थानावर आहेत. आठ खेळाडूंच्या या डबल राऊंड-रॉबिन स्पर्धेत अजून 11 फेऱ्या बाकी असताना वेई यी अर्ध्या गुणासह तळाशी आहे.
प्रज्ञानंदसाठी दमदार सुऊवातीनंतर हा एक मोठा धक्का होता. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना त्याला ‘क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड’ डावाचा सामना करावा लागला. जर त्याने निर्णायक खेळ केला नसता, तर एरव्ही हा सामना सरळ बरोबरीत सुटला असता. विश्वचषक जिंकणारा सर्वांत तऊण खेळाडू सिंदारोव्ह गेल्या वर्षभरात जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडूंपुढे एक कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आला आहे. हा सामनाही त्याला अपवाद नव्हता. कारण या उझबेक खेळाडूने मिळालेल्या संधीच्या जोरावर प्रज्ञानंदने घेतलेला पुढाकार सुऊवातीलाच मोडून काढला. दबाव वाढत गेल्याने प्रज्ञानंद बचावात्मक पवित्र्यात ढकलला गेला आणि डावाच्या मधल्या टप्प्यातील उत्तरार्धात झालेल्या चुकांची मालिका या भारतीय खेळाडूला महागात पडली.
दुसरीकडे, काऊआनाने विजय मिळविलेला सामना इतक्या लवकर संपेल अशी फार कमी जणांना अपेक्षा होती. खेळाची सुऊवात ‘इंग्लिश ओपनिंग’ने झाली आणि सुऊवातीला एका गुंतागुंतीच्या लढतीचे संकेत मिळाले. परंतु वेई यी सुऊवातीलाच जणू तयारीविना खेळला, ज्यामुळे या अमेरिकन खेळाडूला नियंत्रण मिळवण्याची संधी मिळाली. त्याने चतुराईने खेळ करत केवळ 19 चालींमध्ये सामना संपवला. महिलांच्या स्पर्धेत कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेव्हाने चीनच्या झू जिनरला हरवून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आणि अखेर आघाडी घेतली. आर. वैशालीने अॅना मुझीचूकविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवून आपले आव्हान कायम ठेवले, तर महिला विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने पिछाडीवर असताना जोरदार पुनरागमन करत रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाला बरोबरीत रोखले. दिवसाच्या अन्य सामन्यात चीनची खेळाडू टॅन झोंगयीला रशियाच्या अनुभवी कॅटेरिना लॅग्नेकडून पराभव पत्करावा लागला.