महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुद्धिबळ ऑलिम्पियाड : भारताची विजयी सलामी

06:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरुष संघाकडून मोरोक्कोवर 4-0, तर महिलांकडून जमैकावर मात

Advertisement

वृत्तसंस्था/बुडापेस्ट (हंगेरी)

Advertisement

45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आर. प्रज्ञानंदने भारताच्या मोहिमेला योग्य सुरुवात करून दिली असून पहिल्या फेरीत भारतीय पुऊष संघाने मोरोक्कोचा 4-0 असा धुव्वा उडवला, तर महिलांनी जमैकाविऊद्धचा केवळ एक सामना बरोबरीत सोडवत त्यांच्यावर मात केली. जगज्जेतेपदाचा आव्हानवीर डी. गुकेशने सुऊवातीच्या फेरीत न खेळणे पसंत केल्यानंतर प्रज्ञानंदने तिसीर मोहम्मदविऊद्ध सिसिलियन डिफेन्सचा वापर करून मात केली तसेच विदित गुजराथी, अर्जुन एरिगेसी आणि पी. हरिकृष्ण यांनीही आत्मविश्वासाने सुऊवात करताना आरामात विजय मिळविले.

महिला विभागात आर. वैशाली आणि तानिया सचदेव यांनी ‘फर्स्ट टाईम कंट्रोल’मध्ये सुरेख विजय मिळवला. तथापि, इतर दोन पटांवर कडाडून प्रतिकारास तोंड द्यावे लागले. त्यात दिव्या देशमुखला अत्यंत आवश्यक असलेल्या विजयासाठी घाम गाळावा लागला, तर वंतिका अग्रवालची शेवटची लढत अनिर्णीत राहिली. दुसरीकडे, अव्वल मानांकित अमेरिकेने पनामावर 3.5-0.5 असा विजय मिळवला. वेस्ली सो हा एकमेव अमेरिकन खेळाडू असा राहिला, ज्याला वर्चस्व गाजविता आले नाही आणि बरोबरीवर समाधान मानावे लागले. अर्मेनियन-अमेरिकन खेळाडू लेव्हॉन अरोनियनने सुरुवातीच्या अडचणीतून बाहेर सरत पुनरागमन केले आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकन संघाचा सुरळीत प्रवास निश्चित केला. खुल्या विभागातील तब्बल 99 संघांनी विजयासह सुऊवात केली आणि त्यांना प्रत्येकी दोन गुण मिळाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article