For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धेत प्रज्ञानंदची बरोबरी, देशमुख पराभूत

06:47 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धेत प्रज्ञानंदची बरोबरी  देशमुख पराभूत
Advertisement

त.भा.वृत्तसंस्था,

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुधवारी येथे झालेल्या फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धेच्या खुल्या गटातील चौथ्या फेरीत जर्मनीच्या मॅथियास ब्लूबामविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. परंतु दिव्या देशमुख चीनच्या झू जिनरकडून पराभूत झाली तर महिलांच्या गटात आर. वैशालीने रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबत सामना बरोबरीत सोडवला.

दरम्यान, उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला पराभूत करुन स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवला आणि फिडे कॅन्डिडेट्स जिंकण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले.

Advertisement

फिडे महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत, झू जिनर आणि अॅना मुझीचुक यांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवून पुन्हा एकदा गती मिळवली आहे तर मुझीचुक आता बिबिसारा असाउबायेवासोबत संयुक्तपणे आघाडीवर आहे. मंगळवारी तिसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हकडून पराभूत झाल्यामुळे प्रज्ञानंदला आपल्या मोहिमेत मोठा धक्का बसला होता. प्रज्ञानंदने डच ग्रँडमास्टर अनीश गिरीचा पराभव करुन आपल्या मोहिमेची दमदार सुरूवात केली होती.

Advertisement
Tags :

.