महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रदीपचा मृत्यू चटका लावणारा! वहाळ ते आबीटगाव मार्गावर प्रदीप घडशीचा झाला होता अपघात

01:39 PM Sep 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

चार वर्षांपासून करत होता प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय; निष्णात वाहनालक म्हणून परिसरात परिचित

चिपळूण

तालुक्यातील वहाळ ते आबीटगाव मार्गावर झालेल्या मोटारसायकल अपघातात प्रदीप घडशी या तरुणाचा झालेला अपघाती मृत्यू संपूर्ण गावाला चटका लावणारा ठरला आहे. प्रदीप हा परिसरातील गावांमध्ये निष्णांत चारचाकी वाहनचालक म्हणून प्रसिध्द होता. यातून त्याने स्वत: गाडी घेऊन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरु केला होता. असे असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला आहे.

Advertisement

मुळचा वहाळ-घडशीवाडी येथील असलेला प्रदीप त्याचा लहान भाऊ अक्षय याच्या नावे असलेली दुचाकी घेऊन त्याच्या कामासाठी तो वहाळ ते आबीटगाव असा प्रवास करत होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरून झालेल्या अपघातात प्रदीपला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायामुळे तो पंचक्रोशीत सर्वांना परिचित होता.

Advertisement

Advertisement
Tags :
Pradeep GhadshiWahal to Abitgaon route
Next Article