शिक्षकेतर कर्मचारी संघटना कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रदीप देसाई
दाणोली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक प्रदीप देसाई
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य २००५ पुर्वी अंशत:/टप्पा २००५ नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप देसाई यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत अभ्यासू व कार्यतत्पर असलेल्या प्रदीप देसाई यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या आजपर्यंतच्या सर्व आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवून पेन्शनच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांच्याकडे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे पेन्शनग्रस्तांना पेन्शन मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रदीप देसाई यांनी सांगितले. प्रदीप देसाई यांच्या या निवडीबद्दल त्यांचे दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांच्याहस्ते शिक्षक आर जी पाटील, भिवा धुरी, एस एम तीळवे, राजश्री पाटील, सातेरी पाटील, सागर नेसरकर, परशुराम लांबर यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले.