For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रबोधन-मार्मिक तर्फे खुल्या कथा स्पर्धेचे आयोजन

12:09 PM May 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
प्रबोधन मार्मिक तर्फे खुल्या कथा स्पर्धेचे आयोजन
Advertisement

कथा पाठविण्याची अंतिम तारीख ७ जुलै

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगाव संस्था आणि साप्ताहिक मार्मिक यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य सेवक वसंत तावडे स्मृतीप्रित्यर्थ प्रबोधन-मार्मिक खुली कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी या स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक असणार आहे. गेली दोन वर्षे या स्पर्धेला महाराष्ट्रातूनच नव्हे, तर इतर राज्यांमधूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे यंदा ही स्पर्धा दोन विभागांत घेतली जाणार आहे. पहिला विभाग विनोदी कथांचा असून दुसरा विभाग लघुतम कथांचा असणार आहे. त्याला विषयाचे बंधन नसेल.

Advertisement

भव्य बक्षीसांची खुली कथा स्पर्धा

या स्पर्धेतील विनोदी कथांच्या विभागातील प्रथम क्रमांकास रू. १५,०००, द्वितीय क्रमांकास रू. १०,००० आणि तृतीय क्रमांकास रू. ७,५०० या रकमांची पारितोषिके देण्यात येणार आहेत तर लघुतम कथा विभागातील प्रथम क्रमांकास रू. ५,०००, द्वितीय क्रमांकास रु. ३,५०० आणि तृतीय क्रमांकास रू. २,००० अशी पारितोषिके देणार आहेत. विनोदी कथांच्या विभागात प्रत्येकी ५,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. लघुतम कथा विभागात प्रत्येकी १,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.

स्पर्धेसाठी आवश्यक बाबी
विनोदी कथांच्या स्पर्धेसाठी लेखकांनी ३.५०० ते ४,००० या शब्द मर्यादेतील कथा पाठवायच्या आहेत. तर लघुतम कथा ६०० ते ७०० या शब्द मर्यादेत बसणारी असावी. दोन्ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत. कोणत्याही स्पर्धकाला एकाच विभागात कथा पाठवता येईल. दोन्ही विभागांत कथा पाठवल्यास दोन्ही बाद मानल्या जातील. स्पर्धकांनी स्वरचित आणि स्वलिखित कथा युनिकोड फाँटमध्ये टाइप केलेल्या वर्ड फाइलच्या स्वरूपातच पाठवायची असून हस्तलिखित स्वीकारली जाणार नाही. कथा मराठी भाषेत असावी, गरजेनुसार अन्य भाषांतील शब्दांचा तात्कालिक आणि उचित वापर चालेल. कथा सद्धीरुचीहीन नसावी. ती अनुवादित अथवा पूर्वप्रकाशितही नसावी. या कथांचे अर्ज १ ते २६ जून २०२६ या काळात स्वीकारले जातील. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ७ जुलै २०२६ आहे. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कथा मार्मिक दिवाळी अंकापासून त्यानंतरच्या अंकात क्रमशः प्रसिद्ध केल्या जातील. सर्व कथांच्या वापराचे आणि पुनः प्रकाशनाचे सर्व हक्क 'प्रबोधन गोरेगाव' यांच्याकडे असतील. या स्पर्धेसाठीच्या कथा स्पीडपोस्टने किंवा prabhodhankridabhavan2014@gmail.com या ईमेलवर पाठवता येतील. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या कथा स्वीकारल्या जाणार नाहीत. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या कथा पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठविण्याच्या आहेत. पत्ता- प्रमुख कार्यवाह, प्रबोधन गोरेगाव, प्रबोधन क्रीडाभवन, प्रबोधन क्रीडाभवन मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम मुंबई ४००१०४. या स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज स्वतःचे नाव सांगून ७५०६७६०६७६ या क्रमांकावरुन मागवता येतील. यासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेतच स्पर्धकांनी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीजास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.