‘बाका’मध्ये प्रभास मुख्य भूमिकेत
‘बकासुरा’वर आधारित असणार कहाणी
प्रभास सध्या स्वत:च्या आगामी चित्रपटांवरून चर्चेत आहे. यात द राजा साब या चित्रपटासोबत प्रशांत वर्माच्या आगामी चित्रपटाचे नाव सामील झाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘बाका’ ठेवले जाणार असल्याचे समजते. प्रभास हा दिग्दर्शक प्रशांत वर्मासोबत चित्रपट करणार आहे. या चित्रपटाची कहाणी ‘बकासुर’च्या कहाणीवर आधारित असेल. तर प्रशांत वर्मा आणि प्रभास हे या चित्रपटाचे नाव ‘बाका’ ठेवणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटासाठी हैदराबादमध्ये प्रभासची लुक टेस्ट आणि एक अनाउंसमेंट व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. पुढील महिन्यात याची अधिकृत घोषणा होऊ शकते. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे मुख्य नायिका असणार आहे. प्रभास या चित्रपटात नकारात्मक धाटणीची भूमिका साकारणार आहे.
प्रशांत वर्मा यांनी पूर्वी या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंहचे नाव निश्चित केले होते. परंतु रणवीरने अचानक हा चित्रपट सोडून दिला. तर रणवीरनंतर आता या चित्रपटासाठी प्रभासची निवड करण्यात आली आहे. प्रभास सध्या ‘द राजा साब’ आणि हनु राघवपुडीच्या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. त्याच्याकडे स्पिरिट, कल्कि 2 आणि सालार 2 यासारखे मोठे चित्रपट देखील आहेत. यातील द राजा साब हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.