फौजी चित्रपटात प्रभास
हनु राघवपुडी यांचा चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार प्रभास याच्या नव्या चित्रपटाचे नाव आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हनु राघवपुडी यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव फौजी आहे. याच्या पोस्टरवर जबरदस्त अॅक्शन ड्रामाची झलक आहे, तसेच भगवद्गीतेतील काही ओळींचा उल्लेख असून त्याचा अर्थ महाभारतातील कर्ण आणि पांडवाशी निगडित आहे. ‘जो जन्मापासूनच योद्धा आहे, तो गुरुशिवाय एकटा आहे’ असा याचा आशय आहे.
आमच्या इतिहासाच्या लपलेल्या अध्यायांपैकी एका सैनिकाची सर्वात शूर कहाणी असे या पोस्टच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे. प्रभास आणि राघवपुडी यांचा हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतातील कहाणी दर्शविणारा आहे. हा एक देशभक्तीने युक्त वॉरड्रामा असेल, ज्यात प्रभास चित्रपटाच्या नावानुरुप एका सैनिकाच्या भूमिकेत असेल. त्याची ही भूमिका स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी लढणाऱ्या एका बटालियनचे नेतृत्व करणारी असेल. चित्रपट वीरता, बलिदान आणि योद्ध्यांच्या भावनेला मोठ्या पडद्यावर साकार करणार आहे.
फौजी चित्रपटात इमानवी इस्माइल हे खलनायकाच्या भूमिकेत असतील. याचबरोबर अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदा देखील यात दिसून येणार आहेत. या चित्रपटातील नायिकेचे नाव मात्र अद्याप समोर आलेले नाही. प्रभास हा फौजीसोबत कल्कि चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसून येणार आहे. तर द राजा साब हा त्याचा चित्रपट 9 जानेवारीला झळकणार आहे. तर संदीप वांगा रे•ाrसोबत तो स्पिरिट चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार असून यात त्याच्यासोबत तृप्ति डिमरी दिसून येणार आहे.