भाजपा जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कडून आज नूतन जिल्हाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली . प्रभाकर सावंत यांनी 27/28 वर्षांपूर्वी भाजपा युवा मोर्चा पासून कामाची सुरूवात केली . यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य त्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस, संघटण सरचिटणीस ही पदे त्यांनी भूषविली व 2023 मध्ये सिंधुदुर्ग भाजपाचे अध्यक्ष झाले. गेली 2 वर्षे कुशलपणे संघटना हाताळली. या कार्यकाळात नवीन जुने भेदभाव न ठेवता सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला, तसेच सर्व नेत्यांमधील दुवा बनून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम केलेच. परंतु, समाजातील कि वोटर्स म्हणजेच डॉक्टर, वकील, साहित्यिक, विविध संस्था पदाधिकारी यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदारसंघ या निवडणुकामध्ये भाजपाला भरभरून यश मिळाले व सर्वांच्या मदतीने संघटना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली