For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तीशाली चुंबक

06:02 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
शक्तीशाली चुंबक
Advertisement

चुकून हातात घेतल्यास हाडांचा होणार चुरा

Advertisement

निओडिमियम चुंबक जगातील सर्वात शक्तिशाली चुंबक आहे. जेव्हा दोन विपरित ध्रूवांनी युक्त निओडिमियम चुंबकांना एकमेकांच्या नजीक आणले गेल्यास ते इतक्या वेगाने चिकटतात की, त्यांची संरचना निर्माण झालेली चुंबकीय शक्ती सहन करू शकत नाही. आता याच चुंबकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या चुंबकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर एका युजरने पोस्ट केला असून यात हा चुंबक किती शक्तिशाली असतो हे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले असून हा चुंबक निओडिमिम, लोखंड आणि बोरॉनच्या मिश्रणाद्वारे तयार केला जातो.

Advertisement

कुठल्याही चुंबकाची चुंबकीय शक्ती त्याच्या आकारावर देखील निर्भर असते. काही घन सेंटीमीटरपेक्षा मोठ्या नियोडिमियम चुंबकांदरम्यान इतके स्ट्रॉन्ग मॅग्नेटिक फोर्स असते की, दोन चुंबक किंवा लोखंडी पृष्ठभागाखाली दाबलेल्या मानवी शरीराला ईजा पोहोचवू शकते. इतकेच नाही तर हाडे देखील तुटू शकतात. याचमुळे चुकूनही या चुंबकांच्या मध्यक्षेत्रात येण्याचे धाडस केले जाऊ नये.

एका चुंबकात साउथ आणि नॉर्थ असे दोन ध्रूव असतात, सामान्य ध्रूव (एन एन किंवा एस एस) चे दोन चुंबक परस्परांना ढकलतात, तर विपरित ध्रूव (एन एस किंवा एस एन) परस्परांना स्वत:च्या दिशेने खेचत असतात. जर विपरित ध्रूवांचे दोन निओडिमियम चुंबक परस्परांना चिकटल्यास त्यांना सोडविणे जवळपास अशक्य असते. परंतु ज्याप्रकारे प्रत्येक शक्तिशाली गोष्टीत एखादी कमतरता असते, त्याचप्रकारे या चुंबकाला आगीच्या संपर्कात आणल्यास ते स्वत:ची चुंबकीय शक्ती गमावून बसते आणि सामान्य धातून रुपांतरित होत असते.

Advertisement
Tags :

.