मनीकांत बुकिटगारचे दमदार शतक
11:21 AM Dec 12, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगावचा क्रिकेटपटू तसेच कर्नाटक राज्य संघातून खेळणारा मनीकांत बुकिटगार याने बीसीसीआय आयोजित कुच-बिहार चषक क्रिकेट स्पर्धेतील आज ओरिसा संघाविऊद्ध खेळताना त्याने आक्रमक आणि संयमी फलंदाजी करताना 307 चेंडू 20 चौकार, 7 षटकारासह नाबाद 227 धावा केल्या. कर्नाटक संघातर्फे ध्रुव कृष्णा 105 तर अन्वय डेव्हिड 62 धावा कल्या. कर्नाटक संघाने 107 षटकात 3 गडी गमावून 412 धावा फटकाविल्या.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article