महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जरगी येथील वीज उपकेंद्र सुरु

05:35 PM Jan 13, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

धुंदवडे खोरीतील वीजग्राहकांचा १४वर्षांनंतर वनवास संपला.
कोल्हापूर/गगनबावडा.

Advertisement

कधी जागा नाही,कधी मंजूर आहे पण निधी नाही,प्रशासकीय अडचणींचा ससेमिरा तर कधी शेतक्रयांचा लाईन बाबत विरोध अशा या ना त्या कारणांनी तब्बल 14 वर्षे रखडलेले जरगी येथील वीज महावितरणचे उपकेंद्र गेल्या दोन दिवसांपासून सुरु केले आहे. येथील 15 गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.शेतीपंप कनेक्शन मागणीप्रमाणे मिळणार आहेत.
धुंदवडे खोरीतील गावांना गगनबावडा जवळील कातळी फिडरवरुन सुमारे 1980 पासून घरगुती व वीज पंपांना विद्युतपुरवठा सुरू होता.सुमारे 16 किमी अंतरावरील वीजलाईन वनहद्दीतून व डोंगरदरीतून जाते.त्यामूळे वीज कमी,खोळंबा जास्त असा प्रकार सुरु होता.पावसाळ्यात तर महिना महिनाभर वीज गायब असे.दरम्यान 16 नोव्हेंबर 2000 रोजी राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ झाला होता.धरणाचे काम रखडले असले तरी आज ना उद्या धामणी नदी बारमाही वाहणार या आशेपोटी वीजपंपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.गावांचा वाढता विस्तार,नव्याने ओलीताखाली येणारी जमिण त्यामूळे या परिसरात वीज मागणीत कमालीची वाढ झाली.यासाठी येथील जनतेच्या वतीने धुंदवडे खोरीतील गावांसाठी नव्याने महावितरणचे उपकेंद्र व्हावे अशी मागणी केली होती.कोणत्या ठिकाणी व्हावे हे निश्चित नव्हते.2010 साली तत्कालीन आमदार विनय कोरे,उपसभापती श्रीमती भारती कांबळे, शाखा अभियंता किशोर परमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच निजाम म्हालदार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जरगी याठिकाणी या महावितरण उपकेंद्रास प्रशासकीय मंजूरी मिळाली होती.

Advertisement

जरगी उपकेंद्रास प्रशासकीय मंजूरी मिळाली पण निधीची तरतुद करण्यात चालढकल सुरु होती.करवीरचे तत्कालीन व विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री असताना या केंद्रास निधी मंजूर केला व कामास गती मिळाली होता.माजी आमदार कै.पी.एन पाटील यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.सुमारे चार कोटी निधी उपलब्ध असलेल्या या उपकेंद्राचे काम स्पेस इलेक्टीकल्स, कोल्हापूर यांच्या वतीने सुरू होते.कळे,सुळे,पणुत्रे अशी धामणी खोरीतून ही लाईन गेली आहे.खाजगी जमिनीतून,घर,शाळा इमारतीस घासून लाईन नेत असलेला ठपका ठेवून काही शेतक्रयांनी विरोध केला होता.हे सर्व मार्गी लागत गेल्या काही दिवसांपासून या केंद्रावरुन विद्युत् प्रवाह सुरू केला आहे.प्रत्येक्षात या केंद्रास मंजूरी मिळून आज,उद्या अशी 14 वर्षे गेली.यावेळी सुरु झाल्याने येथील शेतक्रयांचा 14 वर्षांचा वनवास संपला आहे.हे केंद्र गगनबावडा तालुक्यात असले तरी सद्या राधानगरी तालुक्यातील कोनोली गांव व संबंधित गाड्यांना विद्युत पूरवठा सुरू आहे.धामणी धरणाच्या सभोवतालच्या मानबेट,चौके,राई,कंदलगाव या गावांना राधानगरी मधून विद्युत पूरवठा आहे.सुमारे वीस किंमती अंतर आहे.या केंद्रापासून चार किंमती अंतर आहे.भविष्यात याही गावांची येथूनच सोय होणार आहे.धामणी धरणाच्या पूर्ततेनंतर येथे वीज मागणी कमालीची वाढणार आहे.

जरगी केंद्राचा दुहेरी फायदा
येथील 15 गावांना घरगुती व मोटर पंपांना पूरेशी व नियमित वीज मिळणार आहे.कळे गगनबावडा दरम्यानची लाईन नादुरुस्त झाली तर या केंद्रावरुन विद्युत पूरवठा जोडता येईल.असा दुहेरी फायदा होणार आहे.
एस.एस.परीट, उपकार्यकारी अभियंता,महावितरण उपविभागीय कार्यालय, गगनबावडा.

विजेचा खोळंबा मागे पडणार.
या परिसरात विजेचा खोळंबा हा एक संशोधनाचा विषय होता.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी येथे वीज आली होती.वनविभागाच्या हद्दीतून लाईन आली आहे.गंजलेले,सडलेले पोल, विद्युत वाहिनी तारा यांची दुरुस्ती करण्यासही मज्जाव केला आहे.जूने जिर्ण विजेचे पोल बोरबेटच्या जंगलात पावसाळ्यात कोसळत.अती पाऊस,दाट धुके वेगाचा वारा त्यामूळे महिनाभर वीज गायब असे.हिवाळा व उन्हाळ्यात मातीच्या बंध्रायांतील धामणी नदीतील पाण्यावरून क्रुषीपंप बंद पाडण्यासाठी काही शेतकरीच रात्री अपरात्री विजेचा खोळंबा करत.असा वर्षभर होणारा नैसर्गिक व मानवनिर्मित खोळंबा मागे पडणार आहे.
पी.आर.चौगले. जरगी

दोन्ही कनेक्शनचा जिह्यातील एकमेव फिडर.
घरगुती व क्रुषी, व्यावसायिक वीज कनेक्शन महावितरणने 2012 घ्या सुमारास सेपरेट केले आहे.येथे दुसरी लाईन आणण्यास वनविभागाने मनाई केली.एकाच लाईनद्वारे ही योजना राबवावी लागली.येथील जनतेला यांचा फटका बसत असे.दोन्ही कनेक्शनचा कातळी हा कोल्हापूर जिह्यातील एकमेव फिडर आहे.
पांडुरंग पाटील धुंदवडे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article