महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रविवारी वीजपुरवठा खंडित

11:04 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीजवितरण केंद्रांमध्ये दुरुस्तीचे काम हाती

Advertisement

बेळगाव : हेस्कॉमच्या 110 केव्ही नेहरुनगर उपकेंद्र, 33 केव्ही सदाशिवनगर, 33 केव्ही जीआयएस श्रीनगर आणि 33 केव्ही आर. एम. 2 या वीजवितरण केंद्रांमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्रांवरून होणाऱ्या वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. यासाठी रविवार दि. 25 रोजी सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागासह उपनगरामध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे. इंडाल फिडरवरून पुरवठा केल्या जाणाऱ्या इंडाल व परिसर, वैभवनगर परिसर ते काकतीवेस, काळी आमराई, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडीसह पोलीस कमिशनर परिसर, पोलीस क्वॉर्टर्स, रेलनगर, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, मुरलीधर कॉलनी, जिनाबकुल परिसर, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल ते सिव्हिल हॉस्पिटल रोड, सुभाषनगर, हनुमान मंदिर नेहरुनगर, विश्वेश्वरय्यानगर, केएलई परिसरात वीजपुरवठा खंडित असणार आहे.

Advertisement

33 केव्ही श्रीनगरच्या व्याप्तीत येणाऱ्या चन्नम्मा सोसायटी श्रीनगर एरियासह अंजनेयनगर, महांतेशनगर परिसरासह कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी, शिवाजीनगर परिसरासह शिवबसवनगर, वीरभद्रनगर, त्रिवेणी हॉटेल, मेटगुड हॉस्पिटल, चन्नम्मा चौक ते कॉलेज रोड, काकतीवेस, क्लब रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर. 33 के. व्ही. सदाशिवनगरच्या व्याप्तीत येणाऱ्या कुमारस्वामी लेआऊट, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, हिंडलगा गणपती मंदिर परिसर, महाबळेश्वरनगर. 33 केव्ही जीआयएसआरएमच्या व्याप्तीत येणाऱ्या टिळकवाडी, हिंदवाडी, जक्कीनहोंड, पाटील गल्ली, शहर परिसरातील किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खानापूर रोड परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. 33 केव्ही जीआयएसआरएम-2 च्या व्याप्तीत येणारा संपूर्ण मिलिटरी एरिया, कॅन्टोन्मेंट, मारुती गल्ली, गणपत गल्ली, नानावाडी, शहापूर, कपिलेश्वर आदी भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article