कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीज गायब, युरोपचे चार देश अंधारात

06:22 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम यांच्यावर संकट

Advertisement

वृत्तसंस्था / पॅरीस

Advertisement

अचानक वीज गेल्याने युरोपातील चार प्रसिद्ध देशांवर अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स आणि बेल्जियम या चार देशांना यामुळे संकटाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. घरे, रस्ते, बोगदे, व्यापारी आस्थापने आणि शिक्षणसंस्था अशा साऱ्यांनाच या ‘ब्लॅकआऊट’चा दणका बसला.

हे चारही देश एकमेकांना जोडलेले असल्याने एका देशात ब्लॅकआऊट झाल्यास त्याचा परिणाम अन्य देशांवरही होतो. असाच प्रकार याहीवेळी झाला आहे. मात्र अचानक वीज का गायब झाली, याचे कोणतेही कारण अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा काय, याविषयीही चर्चा होत आहे.

मंत्रिमंडळाची बैठक

बराच काळ वीज गेल्याने पोर्तुगालच्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. तसेच स्पेनचे नेते पेड्रो सांचेझ यांनी आपल्या देशातील मुख्य वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका कोठे दोष निर्माण झाला आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सोमवारी रात्री स्पेनच्या वीज विभागाने देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात वीजपुरवठा सुरळीत केल्याची घोषणा केली. मात्र, पूर्व आणि पश्चिम विभागात अद्यापही हे संकट अस्तित्वात आहे. मुख्य दोष स्पेनच्या वीजवाहिनीत असल्याचा आरोप आहे.

दूरध्वनीही बंद

बराच काळ वीज गेल्याने या चार देशांमधील लँडलाईन दूरध्वनी यंत्रणेचा वेगही कमी झाला होता. त्यामुळे अनेक स्थानी दूरध्वनी यंत्रणा बंद पडल्याने लोकांना अतिशय त्रासाला तोंड द्यावे लागले. रेल्वेसेवा, विमानसेवा आणि दूरसंचार सेवा अनेक स्थानी ठप्प झाल्या होत्या. प्रवासात असणाऱ्या लोकांना यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. बोगद्यांमधील वीजही गेल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या अनेक स्थानी निर्माण झाल्या. या वीज कोंडीचा परिणाम या चार देशांमधील किमान सहा कोटी लोकांना भोगावा लागला, अशी माहिती देण्यात आली.

रात्री साडेबारापासून

या ब्लॅकआऊटला स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री साडेबारापासून प्रारंभ झाला होता. रात्रभर या चार देशांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते. रात्रीपासूनच दोष दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत होते. पण नेमके कारण कळत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. जवळपास 10 तासांनंतर काही प्रमाणात वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article