2031-32 पर्यंत वीज मागणी 400 गीगावॅटच्या टप्प्यावर?
ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केला अंदाज
नवी दिल्ली :
भारताची सर्वोच्च वीज मागणी 2031-32 पर्यंत अंदाजित 384 गिगावॅटचा आकडा आणि 400 गिगावॅट (जीडब्ल्यू) ची नवीन पातळी सहज पार करू शकते. ‘सीआयआय-स्मार्ट मीटरिंग कॉन्फरन्स’मध्ये ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल माहिती देताना बोलत होते.
ते म्हणाले की, मे महिन्यात विजेची कमाल मागणी 250 गिगावॅटपर्यंत पोहोचलेली नाही. अग्रवाल म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत काही राज्यांमध्ये ज्या प्रकारे विजेची मागणी वाढली आहे, ती पाहता वर्ष 2031-32 पर्यंत विजेची मागणी 384 जीडब्ल्यूपर्यंत पोहोचेल आणि ती 400 जीडब्ल्यूपर्यंत सहज पोहचू शकेल. यासाठी आपल्याकडे 900 गिगावॅटची स्थापित (वीज निर्मिती) क्षमता असायला हवी.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर्षी जास्तीत जास्त विजेची मागणी 260 गिगावॅट राहण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान सचिव म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत मागणी 260 गिगावॉटच्या अंदाजे पातळीपर्यंत पोहोचू शकते. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच गेल्या काही दिवसांपासून विजेची सर्वाधिक मागणी घटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.