महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

10:29 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शहराच्या दक्षिण भागात रविवार दि. 25 रोजी हेस्कॉमकडून वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत वीजपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. उद्यमबाग येथील जैन इंजिनिअरिंग, चेंबर ऑफ कॉमर्स परिसर, जीनेश्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, वसंतविहार कॉलनी, अनगोळ परिसर, बेम्को कॉर्नर परिसर, उद्यमबाग परिसर, दो•ण्णावर कंपाऊंड, दामोदर कंपाऊंड, जीआयटी कॉलेज परिसर, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर रोड, पाटील मळा, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, भवानीनगर, पार्वतीनगर, गोडसेवाडी, विश्वकर्मा कॉलनी, पोस्टल कॉलनी, जैतनमाळ परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्याचबरोबर बाबले गल्ली अनगोळ, नाथ पै नगर, शिवशक्तीनगर, रघुनाथ पेठ, चिदंबरनगर, बडमंजी मळा, इंदिरानगर, खानापूर रोड, दुसरे रेल्वेगेट परिसर, संत रोहिदासनगर, मजगाव, कलमेश्वरनगर,कामगार कार्यालय परिसर, संत ज्ञानेश्वरनगर, हलगेकर कंपाऊंड यासह परिसरात वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

Advertisement

मंगळवारीही वीजपुरवठा खंडित

Advertisement

मंगळवार दि. 27 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, कलमठ रोड, पी. बी. रोड, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, नाना पाटील चौक, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, आरटीओ कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, खडेबाजार, काकतीवेस, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, उज्ज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, मारुतीनगर, दरबार गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगूळ गल्ली, भोवी गल्ली परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article