कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता होणार हायटेक

05:50 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा :

Advertisement

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची सुधारणा व सुशोभिकरण करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सीआरएफमधून 50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा रस्ता हायटेक होणार आहे.

Advertisement

मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, प्रशांत खैरमोडे, आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आदी उपस्थित होते. या रस्त्याचे सुशोभिकरण करताना कोणकोणती कामे, सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत याबद्दलच्या आराखड्याची चित्रफितीद्वारे बैठकीत माहिती देण्यात आली. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे काँक्रीटीकरण, डिव्हायडर, फुटपाथ, सायकल ट्रॅक, रस्त्याच्या बाजूने बाग-बगीचे, बंदिस्त गटर यासह पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सातारा एक ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे रस्त्यांची सुधारणा करताना पर्यटन वाढीचा दृष्टिकोन ठेवून काम करा. रस्त्याचे काम करताना प्रत्येक काम दर्जेदार करण्याची सूचना शिवेंद्रसिंहराजेंनी केली. तसेच हा रस्ता शहरातील सुंदर आणि आकर्षक रस्ता करण्याचा प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्यावरील कूपर कॉलनी येथील नागरिकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाचा उपयोग करून याठिकाणी दुतर्फा वाहतूक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article