गर्दीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
कोल्हापूर :
कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज रस्त्यावर कायम गर्दी असते. हा रस्ता लक्ष्मीपुरी बाजारपेठेत जात असल्याने रात्री दहापर्यंत वाहनांची वर्दळ असते. एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन ते अंबाबाई मंदिरकडेही याच रस्तयाने लोक जातात. परंतू या गर्दीच्या रस्त्यावर मध्यभागी भलेमोठे खड्डे आहेत. शिवाय साईट पट्ट्याही खड्ड्यातच असल्याचे दिसते.
लक्ष्मीपुरी भाजी मंडई, धान्य लाईन, रिलायन्स मॉल, एलआयसी, दसरा चौकातही याच रस्त्यावरून लोक जातात. शहराच्या मध्यभागी असलेल्या या रस्त्यावर ड्रेनेजशेजारी आणि ट्रॉफिक सिग्नलला लागूनच खड्डे आहेत. या स्त्यावर सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी असते. मुख्य बाजारपेठेला लागूनच हा रस्ता असल्याने बहुतांश नागरिकांची येजा असते. या रस्त्यावरील सिग्नलही रात्री नऊपर्यंत सुरू असतात. ट्रॉपिक पोलिस नेहमीच तैनात असतात. परंतू हे पोलीस वयाने लहान असलेल्या वाहनधारकांना रोखण्यात कायमच व्यस्त असतात. फोर्ड कॉर्नरला वाहनधारक नाही सापडला तर उमा टॉकीजला नक्कीच सापडतो. त्यामुळे हे ट्रॉपिक पोलीस पावत्या करण्यावर जास्त लक्ष देतात.
सुभाष रोडवरील ड्रेनेजवळील खड्ड्यात अनेकदा अपघात झाले आहेत. परंतू या खड्ड्याकडे नेहमीच महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येते. फोर्ड कॉर्नर आणि उमा टॉकिजच्या सिग्नलच्या चाही बाजूंनी खड्डे आहेत. रस्तयावर गर्दी असल्याने दुचाकीस्वार साईड पट्टीवरून जायचा प्रयत्न करतात. परंतू उमा टॉकीज येथील साईडपट्टीवरील खड्ड्यात अनेकदा अपघात झाले आहेत.
- नागरिकांकडून नियम पायदळी
रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजक आहे. परंतू दुभाजकाच्या मधून रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या जागेतूनही दुचाकीस्वार जातात. त्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. याकडे ट्रॉफिक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते.
- दोन्ही बाजूंनी गर्दी
कायम रस्त्यावर गर्दी असते, तरीही रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांचे स्टॉल आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विविध प्रकारची दुकान असल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचीही नेहमीच गर्दी असते. फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीजपर्यंत चारचाकी आणि दुचाकीस्वारांची वर्दळ असते. मधूनच एखादी एस. टी. किंवा के. एम. टी. आल्यानंतर वाहनधारकांची चांगलीच फजिती होते.
- रिलायन्स मॉलजवळ नेहमीच वाहनांचा अपघात
रिलायन्स मॉलमध्ये खरेदीला जाणाऱ्या आणि लक्ष्मीपुरी बाजारात जाणाऱ्या लोकांच्या वाहनांची गर्दी असते. त्यात फेरीवाल्यांच्या स्टॉलवरील गर्दी त्यामुळे वाहनाला जायला रस्ताच उरत नाही. परिणामी या परिसरात नेहमीच अपघात होतात.
- अवजड वाहनांचा त्रास
लक्ष्मीपुरीतील धान्य लाईनला धान्य पुरवठा करणारी अवजड वाहना या रस्तयावर नेहमीच असतात. त्यामुळे या अवजड वाहनांचा प्रवाशांना नेहमीच त्रास होत आहे. याकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- वाहतुक कोंडी
या रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी झालेली असते. केएम. टी. , एस. टी.सह सर्वच प्रकारची वाहन या रस्त्यावरून जातात. अनेक भागांना जोडणारा रस्ता असल्याने वाहतुक कोंडीचा नागरिकांना त्रास होते. दसरा चौकात एखादे आंदोलन असल्यानतंर या रोडवरूनच सर्व वाहने जात असतात.