For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | कुमठे फाटा ते सामाणी मळा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थ संतापले

04:58 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   कुमठे फाटा ते सामाणी मळा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य  ग्रामस्थ संतापले
Advertisement

कांचनपूर ग्रामस्थांचे 'रस्ता रोको' आंदोलन इशारा

Advertisement

सोनी - कुमठे फाटा ते मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सामाणी मळ्यापर्यंतचा सुमारे १२ किलोमीटरचा रस्ता सध्या दयनीय अवस्थेत असून, या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या परिस्थितीमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या कांचनपूर परिसरातील ग्रामस्थांनी आता थेट 'रास्ता रोको' आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रवाशांचा जीव टांगणीला
हा १२ किलोमीटरचा टप्पा सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Advertisement

कामाचा कासववेग आणि केवळ मलमपट्टी
हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो. या मार्गावर दुपदरी महामार्गाचे काम नियोजित आहे. फलटणकडून मिरजेकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सध्या मायणीपर्यंत पोहोचले आहे. मात्र, काकडवाडी ते सामाणी मळा या पट्ट्यात प्रशासनाकडून केवळ मुरूम टाकून 'मलमपट्टी' केली जात आहे. पावसाळ्यात किंवा जड वाहतुकीमुळे हा मुरूम बाहून जात असल्याने परिस्थिती 'जैसे थे' होत आहे. प्रशासनाने किमान 'पॅचवर्क' करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. गळीत हंगाम संपला असला तरी, खराब रस्त्यामुळे काही महिन्यांत एक-दोन वेळा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Advertisement
Tags :

.