सावंतवाडी बसस्थानकावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ
05:52 PM Jun 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी -
Advertisement
सावंतवाडी बसस्थानक आवारात दरवर्षी पावसामुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांसह एसटी बस चालविताना चालकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे . या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळ विभागाकडून आवारातील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळणार आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच बसस्थानक पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापले जाते. याचा त्रास प्रवाशांना होतो. प्रवाशांच्या अंगावर खड्ड्यातील चिखलाचे पाणी उडून कपडे खराब होण्याचे प्रकार घडतात . या प्रश्नी सर्व राजकीय पक्षाच्या पुढारी व कार्यकर्त्यांकडून तसेच प्रवासी संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर महामंडळाला जाग येते. परंतु आता खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
Advertisement
Advertisement