कोल्हापूरात रंगली पोस्टरबाजी
महायुती समर्थक आणि मविआ समर्थकांचे पोस्टर आमने सामने
कोल्हापूर
यंदाची कोल्हापूर विधानसभा निवडणूक ही चांगलीच गाजली. कोल्हापूर जिल्ह्याच्या दहाही मतदार संघात महायुतीचे नेते निवडून आले. निवडणुकीच्या निकालानंतर शहरात विविध ठिकाणी अभिनंदनाचे होर्डींग्ज लागले.
एकीकडे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांचे अभिनंदनाचे बॅनर गल्लोगल्ली लागले. तर दुसरी मविआचे आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यात आमचं निस्तरायला साहेब घट्ट आहे, निष्ठेत तडजोड नाही अशा आशयाचे बॅनर लावले गेले आहेत.
कसबा बावडा परिसरात एकिकडे आमदार क्षीरसागर यांच्या समर्थकांचे अभिनंदनाचे बॅनर तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांचे निष्ठा जपणारे बॅनर लावले गेले आहेत. त्यामुळे कसबा बावडा परिसरात या विधानसभा निकालानंतर पोस्टर वॉर चांगलेच रंगले आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपचे उमेद्वार आमदार अमल महाडिक आणि कॉंग्रेसचे उमेद्वार व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्या लढत होती. तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि कॉंग्रेसचे उमेद्वार राजेश लाटकर यांच्यात लढत होती. या दोन्ही मतदार संघातून महायुतीचे उमेद्वार निवडून आले.