‘एकाकी’ सीरिजचे पोस्टर सादर
अभिनेता आणि दिग्दर्शक आशीष चंचलानीची नवी सीरिज ‘एकाकी’चे पोस्टर सादर करण्यात आले आहे. आशीष चंचलानीकडून या सीरिजची निर्मिती करण्यात आली असून तोच दिग्दर्शन करत आहे. ही सीरिज थ्रिलर धाटणीची असून यात हॉरर अन् कॉमेडी देखील असेल. आम्ही तुम्हा सर्वांना यंदा एका ट्रिपवर बोलावत आहोत, एकाकीमध्ये राहून तुम्ही कधी एकटे राहणार नाही हे लक्षात ठेवा अशी कॅप्शन देत आशीषने याचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये आशीष हातात कंदिल घेऊन चालत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच त्याच्यासमोर अनेक हात असून ते त्याला बोलावित असल्याचे दिसून येते. याचबरोबर सीरिजमधील अन्य कलाकारांचे पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. एकाकी सीरिजमध्ये आकाश डोडेजा, हर्ष राणे, सिद्धांत सरफरे, शशांक शेखर, रोहित साधवानी, ग्रिशिम नवानी हे कलाकार सामील आहेत. एसीव्ही स्टुडिओजच्या युट्यूब चॅनेलवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.