अभाविपतर्फे दिल्ली येथे होणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनचे पोस्टर प्रक्षेपण
पणजी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) गोवा प्रांततर्फे अभावीपच्या ’अमृत मोहोत्सव वर्ष’ अंतर्गत 7 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनचे पोस्टरचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी अभाविप गोवा राज्य संयोजक धनश्री मांद्रेकर, उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अवधूत कोटकर, पणजी येथील अभाविप गोवा कार्यालयात उपस्थित होते. 69 वे राष्ट्रीय अधिवेशन हा चार दिवसांचा कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा आहे. अभाविप, आपल्या संघटनात्मक प्रवासाची 75 वर्षे पूर्ण करत असून, तऊणांना त्यांच्या संघटनात्मक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प? आणि विद्यार्थी चळवळींमध्ये अभाविप ची भूमिका जाणून घेण्याचा उद्देश आहे. देशभरातील तऊणांचा हा मेळावा भारताची व्याख्या करणारी ’विविधतेतील एकता’ दाखवेल. यासाठी अभाविपने या परिषदेचा एक भाग म्हणून विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थी चळवळ म्हणून 75 वर्षांच्या अस्तित्वाच्या काळात, अभावीप ने तऊणांशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांना सातत्याने हाताळले आहे. दिल्लीतील आगामी राष्ट्रीय परिसंवाद आजच्या शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनशील घटकांवर प्रकाश टाकण्यासाठी सज्ज आहे, तसेच समाज, तऊण आणि शिक्षणाशी संबंधित बाबींवरही प्रकाश टाकणार आहे. असे अभाविप गोवा राज्य संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी सांगितले आहे.