‘दृश्यम 2’चे पोस्टर अन् टीझर सादर
अजय पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत
अजय देवगण आणि तब्बू तसेच श्रिया सरन यांचा थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम 2’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. दृश्यम 2 मध्ये पुन्हा एकदा विजय साळगावकर ही भूमिका अजय देवगण साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर अन् टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.
युटय़ूबवर शेअर करण्या आलेल्या टीझरमध्ये दृश्यममधील अनेक छोटय़ा-छोटय़ा क्लीप्स प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल्या आहेत. यात अजय देवगण स्वतःच्या भूमिकेत कॅमेऱयासमोर बसून गुन्हय़ाची कबुली देताना दिसून येत आहे. निर्मात्यांनी या रिकॉल टीझरसाब्sात चाहत्यांची उत्सुकता वाढविण्यास यश मिळविले आहे.
या टीझरला अजयने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘विजय आणि त्याच्या कुटुंबाची कहाणी तुम्हाला आठवत तर आहे ना’ असे नमूद केले आहे. तर दृश्यम 2 च्या पोस्टरमध्ये अजय देवगण महासत्संगच्या द्वाराबाहेर उभा असल्याचे दिसून येते. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अजय आणि तब्बूसोबत या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता आणि मृणाल जाधवसोबत रजत कपूर आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
दृश्यम हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित मल्याळी चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात मोहनलाल यांनी काम केले होते.