For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डाकघर कार्यालयात २१ मार्चला डाक अदालत

05:24 PM Mar 12, 2025 IST | Pooja Marathe
डाकघर कार्यालयात २१ मार्चला डाक अदालत
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथील कार्यालयात २१ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.

कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार प्रवर अधीक्षक ए.यु. निखारे, यांच्या नावे दोन प्रतींसह 17 मार्च 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.