जैन संत विद्यानंद सन्मानार्थ टपाल तिकिट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगद्विख्यात जैन संत विद्यानंद मुनी महाराज यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुनी विद्यानंद यांच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘धर्म चक्रवर्ती’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. मी हा सन्मान अत्यंत विनम्र भावनेने आणि मुनिमहाराजांचा प्रसाद म्हणून स्वीकारत आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. शनिवारपासून संत विद्यानंद मुनिमहाराज यांच्या जन्मशताब्दी उत्सावाला प्रारंभ करण्यात आला. हा उत्सव एक वर्षभर चालणार आहे. याच दिवशी 1987 मध्ये संत विद्यानंद मुनिमहाराजांना ‘आचार्य’ हा बहुमान प्रदान करण्यात आला होता. या शताब्दी कार्यक्रमाला असंख्य जैन बांधवांनी उपस्थिती दर्शविली आहे. हिंदू धर्माच्या अनेक भाविकांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. आचार्य विद्यानंद मुनिमहाराज यांचा शांतीचा आणि सौहार्दाचा संदेश आजच्या परिस्थितीत विशेषत्वाने महत्वाचा ठरतो. त्यांची शिकवण आज आपल्यासाठी अधिकच मोलाची ठरत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सन्मान प्रदान करण्यात आल्यानंरच्या भाषणात केले आहे.