महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राणी चन्नम्मा यांच्या नावाने पोस्ट तिकीट

11:22 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या नावाने टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राणी चन्नम्मा यांचे कार्य देशभर पोहोचविण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी स्वागत केले आहे.  चन्नम्मा यांच्या विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या नावाने पोस्ट तिकीट सुरू करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी व इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली होती. याची दखल घेत 23 ऑक्टोबर रोजी या तिकिटाचे अनावरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article