कुणकावळे - चौके रस्त्यावर पाईपलाईन खोदाईमुळे अपघाताची शक्यता
चौके / प्रतिनिधी
मालवण - कसाल मार्गावरील कुणकावळे ते चौके दरम्यान महाराष्ट्र विद्युत कंपनीकडून जमिनीखालून चौके भराडी मंदिर रस्तावर करण्यात आलेल्या पाईप लाईन खोदाई करण्यात आली असून या पाईपलाईनमुळे एखादा मोठा अपघात होउन जीवतहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.संबधित अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही यांची दखल घेतली जात नसल्याने याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तरी यांची दखल विद्युत महामंडळाच्या अधिकारी वर्गाने घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे .
सदर रस्त्यावर खोदाई करुन त्यामध्ये केबल टाकून ती पाईपलाईन ओपन ठेवण्यात आली आहे. पाईप लाईन रस्त्याच्या अगदी साईटपट्टीवरती मारण्यात आली असुन या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.काही ठिकाणी तर पाईपलाईन वळणावरती मारण्यात आलेली असुन खोदाई केलेली माती रस्तावरती आली आहे.या मातीमुळे घसरून बर्याच मोटार सायकलस्वाराचा अपघात झालेला आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग का लक्ष घालत नाही असा सवाल विचारला जात आहे.