For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यसनमुक्ती मोहिमेत सकारात्मक प्रगती

06:43 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्यसनमुक्ती मोहिमेत सकारात्मक प्रगती
Advertisement

पंतप्रधानांची ‘मन की बात’ : ‘तिरंगा सेल्फी’चे कौतुक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 137 व्या भागाला संबोधित केले. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना देशवासियांना सकारात्मक उपक्रमांसह पुढे जाण्याचे आवाहन केले. ‘मन की बात’मध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी देशात सुरू असलेल्या नवीन आणि सर्जनशील प्रयत्नांचा उल्लेख केला.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ला नवीन उपक्रम सादर करण्याचे व्यासपीठ म्हटले आहे. रविवार, 30 ऑगस्टच्या भागात पंतप्रधान मोदींनी व्यसनमुक्तीच्या मुद्यावर विशेष भर दिला. व्यसनमुक्त युवा अभियान वेगाने प्रगती करत आहे. आपण व्यसनमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत असून हा उपक्रम व्यसनमुक्त भारतासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तरुण व समाजातील सर्व घटकांना या दिशेने सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.  देशातील तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हा आपला सामूहिक संकल्प असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त भारताच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना व्यसनमुक्ती जनजागृतीशी संबंधित सामग्री तयार करण्यास सांगितले.

भारतीय तिरंगा जगभर फडकला

पंतप्रधानांनी यावर्षी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आल्याचेही जाहीर केले. ‘सूर्यपथ तिरंगा’च्या माध्यमातून फिजीपासून जगभरात तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. फिजीमधील सुवा येथे सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर, आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावास आणि कार्यालयांवर तिरंगा फडकत राहिल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.