फेब्रुवारीमध्ये कार कंपन्यांची सकारात्मक कामगिरी
टाटासह अन्य कंपन्यांच्या कार्सचा समावेश
नवी दिल्ली :
देशातील कार उत्पादकांनी फेब्रुवारी 2026 साठी त्यांचे विक्रीचे रेकॉर्ड देखील जाहीर केले आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये सर्वाधिक लोकांना आवडलेल्या आणि खरेदी केलेल्या 5 कारबद्दल माहिती घेणार आहोत.
टाटा नेक्सॉन : प्रख्यात कार उत्पादक टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही फेब्रुवारी 2026 ची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण 19,430 लोकांनी टाटा नेक्सॉन खरेदी केली आहे.
टाटा पंच : टाटा मोटर्सची एसयूव्ही टाटा पंच ही फेब्रुवारी 2026 ची तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये टाटा पंचच्या एकूण 18,748 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
ह्युंदाई क्रेटा : भारतातील चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये, ह्युंदाई क्रेटाने एकूण 17,938 युनिट्स विकल्या. ह्युंदाई क्रेटाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.79 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा
फेब्रुवारी 2026 मध्ये मारुती सुझुकी ब्रेझा पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. या कालावधीत मारुती सुझुकी ब्रेझाच्या एकूण 17,863 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.