जागतिक सकारात्मक संकेताने बाजारात तेजी
सेन्सेक्स 397 अंकांनी तेजीत : मिडकॅप-स्मॉलकॅप समभाग वधारले
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सुद्धा गुरुवारी तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 397 अंकांनी तर निफ्टी 132 अंकांनी वाढत बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांची कामगिरी चांगली झाली असून बँक निफ्टी निर्देशांक सुद्धा वधारत बंद झाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 397 अंकांनी वाढत 82307 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 132 अंकांनी वाढत 25289 अंकांवर बंद झाला.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकाच्या कामगिरीवर नजर टाकली असता फक्त रिअल्टी निर्देशांक घसरणीत राहिला होता. एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक 575 अंकांनी वाढत 51978 च्या स्तरावर बंद झाला. याच्या पाठोपाठ एनर्जी निर्देशांकाने देखील 376 अंकांची उसळी घेत 33747 वर बंद होण्यामध्ये यश मिळवले होते. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसइ, फायनान्शियल, मेटल, फार्मा, ऑइल अँड गॅस, इन्फ्रा आणि आयटी या निर्देशांकानी देखील तेजी दाखवत बाजाराला आधार दिला.
हे समभाग तेजीत
शेअर बाजारात डॉक्टर रे•ाrज लॅब्स, बीईएल, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, ओएनजीसी, टीसीएस, इन्फोसिस, इंडिगो, एशियन पेंट्स आणि इंडिगो यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
इटर्नल, टायटन, एसबीआय लाइफ, आयशर मोटर्स, मॅक्स हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल, मारुती सुझुकी, जियो फायनान्शियल यांचे समभाग घसरणीत राहिले होते. मिडकॅप निर्देशांकामध्ये पाहता बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, अपोलो ट्युब, टाटा केमिकल्स, अशोक लेलँड यांचे समभाग तेजीत होते तर घसरणीमध्ये कल्याण ज्वेलर्स, टाटा कम्युनिकेशन, गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश होता. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांची खरेदी गुरुवारी पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत ट्रम्प यांचे सकारात्मक विधान बाजाराला तेजी राखण्यामध्ये हातभार लावणारे ठरले. आशियाई बाजारामध्ये कोरियाचा कोस्पी 1.87 टक्के वाढत 5001 वर बंद झाला तर जपानचा निक्केई निर्देशांक 1.77 टक्के वाढत 53,706 अंकांवर व्यवहार करत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.15 टक्के व चीनचा शांघाई कंपोझिट 0.15 टक्के घसरला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- डॉ. रे•ाrज लॅब 1218
- बीईएल 417
- अदानी एन्टरप्रायझेस 2088
- अदानी पोर्ट 1416
- टाटा स्टील 189
- बजाज ऑटो 9387
- टाटा मोटर्स पीव्ही 347
- कोल इंडिया 423
- श्रीराम फायनान्स 1007
- एसबीआय 1050
- नेस्ले इंडिया 1309
- ग्रासीम 2787
- बजाज फिनसर्व्ह 1995
- एशियन पेंट्स 2704
- इंडिगो 4929
- पॉवरग्रिड कॉर्प 259
- सनफार्मा 1635
- कोटक महिंद्रा 427
- एनटीपीसी 342
- ट्रेंट 3810
- ऑईल इंडिया 434
- पीडीलाईट 1452
- श्री सिमेंट 27430
- एसआरएफ 2735
- सुंदरम फायनान्स 5080
- सिंफनी 855
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इटर्नल 276
- एसबीआय लाईफ 2024
- टायटन 4022
- आयशर मोटर्स 7046
- मॅक्स हेल्थ केअर 999
- अपोलो हॉस्पिटल 6804
- मारुती सुझुकी 15735
- आयसीआयसीआय 1347
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1404
- लोढा 945
- मोतीलाल ओसवाल 773
- एनएमडीसी 78
- ओबेराय रियल्टी 1480
- नॅटको 834
- थरमॅक्स 2920