कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोपा विमानतळावरील कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा

03:08 PM Oct 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

भारतीय कामगार सेनेचा पुढाकार

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

गोव्यातील मोपा एअरपोर्टवर बीएफएस इंडिया या ग्राऊंड हॅण्डलिंग कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी आपल्यावर होणारा अन्याय, अपमानास्पद वागणूक, सवलती आणि पगारवाढी संदर्भात भारतीय कामगार सेनेने नुकतीच या कंपनीच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केली. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत असून भारतीय कामगार सेनेवरील विश्वास दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम आणि सहचिटणीस सुजित कारेकर यांच्या प्रयत्नामुळे बीएफएस इंडिया या गोव्यातील मोपा एअरपोर्टवर ग्राऊंड हॅण्डलिंग कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला. संजय कदम यांनी कामगारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यानंतर भारतीय कामगार सेनेने कंपनीचे सीओ पीयूष खन्ना यांच्यासोबत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. त्यावर पीयूष खन्ना यांनी युनियनच्या सर्व मागण्या मान्य करून कामगारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस विजय तावडे, सुजित कारेकर, कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वारसे, बीएसएफचे कमिटी मेंबर जयकरा गवस, दिनेश राऊळ, मयूर कणसे, दीपेश गोवेरकर, जयराम सावंत, राजदीप धुरी, विकास कांबळे, तुषार पाटकर व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article