For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मन की बात’ कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल

08:06 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मन की बात’ कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

सांखळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून समाजातील सकारात्मक बदल, राष्ट्रसेवा, नवोपक्रम आणि जनसहभागाच्या प्रेरणादायी कथा देशवासीयांपर्यंत पोहोचत असून, ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Advertisement

रविवारी साखळी रवींद्र भवन येथे आयोजित ‘मन की बात’च्या 136 व्या भागाच्या सामूहिक श्र्रवण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, भाजप पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना कृतज्ञ राष्ट्रातर्फे भावपूर्ण अभिवादन केले.   भारत संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी आयएनएस महेंद्रगिरीचे नौदलात समावेशन, पिनाका लाँग रेंज गाईडेड रॉकेट तसेच ‘कुश’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख केला.

देशभर राबविण्यात आलेल्या ‘पॅच द रेन’ अभियानाला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करत जलसंवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीमुळे देशाचा गौरव वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.