पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात दागिने लुटले
रत्नागिरी :
शहरातील अहमदा पार्क 80 फुटी हायवेनजीक पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेचे दागिने लुटल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना मंगळवारी दुपारी 2.15 च्या सुमारास घडल़ी रशिदा रशीद साखरकर (70, ऱा मिरकरवाडा रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आह़े या प्रकरणी रशिदा यांनी दुचाकीवरुन आलेल्या दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केल़ी.
रशिदा साखरकर या 8 एप्रिल रोजी शहरातील अहमदा पार्क येथून जात होत्य़ा दुपारी 2.15 च्या सुमारास दुचाकीवरून दोघे इसम रशिदा यांच्याजवळ आल़े यावेळी दोघांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्याकडील सोन्याच्या कानपाकळया, साखळया व कुडी काढून घेतल़ी यानंतर दोन्ही संशयित त्या ठिकाणाहून फरार झाल़े. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रशिदा यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केल़ी संशयितांपैकी एकाने सफेद रंगाचे शर्ट व फुल पॅन्ट परिधान केली होत़ी तसेच डोळयावर काळ्या रंगाचा गॉगल लावलेला होत़ा तर दुसऱ्या इसमाने खाकी रंगाचे कपडे परिधान केले होत़े, असे तक्रादार महिलेने तक्रारीत नमूद केले आह़े पोलिसांनी गुह्याची नोंद केली आहे.