For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्वरी येथील फ्लाय ओव्हरप्रकरणी आज तोडगा निघण्याची शक्यता

10:34 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्वरी येथील फ्लाय ओव्हरप्रकरणी आज तोडगा निघण्याची शक्यता
Advertisement

पणजी: पर्वरी येथील फ्लाय ओव्हर प्रकरणी आज सोमवारी अंतिम निर्णय होईल, असा अंदाज आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे मंत्रालयात आयोजन केले असून त्यामध्ये पर्वरीच्या नागरिकांना न्याय देण्यासंदर्भात चर्चा होईल. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती देताना सांगितले की, रविवारी फ्लाय ओवरच्या खालून पर्वरी येथे वाहनांची फार मोठी गर्दी नव्हती. आज सोमवारपासून सर्व शाळा, हायस्कूल्स, महाविद्यालये पुन्हा सुरू होत आहेत. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये देखील आजपासून पूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित राहणार आहे. म्हणून सोमवारीच वाहतुकीची नेमकी परिस्थिती लक्षात येईल.

Advertisement

आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरीत मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होईल. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना बोलाविण्यात आले आहे. पर्वरीचा आमदार या नात्याने आपण स्वतः बैठकीस उपस्थित राहणार आहे. याशिवाय म्हापसा आणि साळगाव या मतदारसंघांचे आमदारही बैठकीस उपस्थित राहतील. बैठकीत पर्वरीच्या फ्लायओव्हर प्रकरणी अंतिम तोडगा निघेल, असे खंवटे म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.