पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवीजवळ फेकलेले पिस्तूल पोलिसांनी केले जप्त; एक राऊंडही ताब्यात
07:05 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पर्वरी : मॅजेस्टिक, पर्वरी येथे कॅसिनो मालकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत थिवी रेल्वे स्थानकाजवळील स्मशानभूमी परिसरातून पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड जप्त केला.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने गोळीबाराचा प्रयत्न केल्यानंतर थिवी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला. त्याने फायरिंगसाठी वापरलेले पिस्तूल आणि एक राऊंड स्मशानभूमी परिसरात फेकून दिल्याचा पोलिसांना संशय होता.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली. त्यावेळी पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड पोलिसांच्या हाती लागला.
Advertisement
जप्त करण्यात आलेले शस्त्र या प्रकरणात वापरले गेले होते का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Advertisement