For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

FIFA World Cup 2026 रोनाल्डोची जादू चालली...ठरला मॅन ऑफ द मॅच, पोर्तुगालने उझबेकिस्तानच्या जाळीत ५ गोल डागले

05:29 PM Jun 24, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
fifa world cup 2026 रोनाल्डोची जादू चालली   ठरला मॅन ऑफ द मॅच  पोर्तुगालने उझबेकिस्तानच्या जाळीत ५ गोल डागले
Advertisement

फिफा विश्वचषकाचा फिवर जगभरात सुरु असताना अनेक फुटबॉल शौकिनांचा लाडका फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपली जादू दाखवली. २०२६ च्या १३ व्या दिवशी चार सामने खेळले गेले. पोर्तुगालचा सामना उझबेकिस्तानशी, इंग्लंडचा घानाशी, क्रोएशियाचा पनामाशी आणि कोलंबियाचा डीआर काँगेशी झाला.

Advertisement

दिवसाच्या पहिल्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोची जादू पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यातील आपल्या संघाच्या अपयशाबद्दल टीकेला सामोरे गेलेल्या रोनाल्डोने दोन गोल केले. यासोबतच, प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंड संघाला घानाचा बचाव भेदता आला नाही. २०१८ चा उपविजेता क्रोएशियाने या वर्षीच्या स्पर्धेत आपले खाते उघडले आहे, तर पनामाच्या नॉकआऊटमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. कोलंबिया नॉकआऊटमध्ये पोहोचणारा ७ वा देश ठरला आहे.

रोनाल्डोने उझबेकिस्तानविरुद्ध दोन गोल केले.

गट फेरीत पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो दोन गोल करून या विजयाचा नायक ठरला. या विजयामुळे पोर्तुगालने ३२ संघांच्या फेरीत पोहोचण्याची आपली आशा बळकट केली आहे. दोन सामन्यांनंतर संघाकडे आता चार गुण आहेत.

Advertisement

रोनाल्डोने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला आपला दर्जा दाखवत संघासाठी पहिला गोल केला आणि त्यांना १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे रोनाल्डोने एक ऐतिहासिक कामगिरीही केली. तो सहा विश्वचषकांमध्ये गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला . नुनो मेंडेसने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला पोर्तुगालची आघाडी दुप्पट केली.

मग, ३९ व्या मिनिटाला रोनाल्डोने सामन्यातील आपला दुसरा आणि तिसरा गोल केला. या गोलमुळे पोर्तुगालने पहिला हाफ ३-० च्या आघाडीने संपवला. दुसऱ्या हाफमध्ये, उझबेकिस्तानचा गोलकीपर नेमातोव्हने चुकून आत्मघाती गोल केल्यामुळे पोर्तुगालची आघाडी ४-० पर्यंत वाढली. ८७ व्या मिनिटाला राफा लिओने पाचवा गोल करून पोर्तुगालच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Advertisement
Tags :

.