लोकप्रिय स्कूटर ‘व्हेस्पा’ लाँच
स्कूटरमध्ये 5 इंच टीएफटी डिस्प्ले, किंमत लाखावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पियाजिओ व्हेइकल्सने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या लोकप्रिय स्कूटर व्हेस्पाच्या संपूर्ण मॉडेल्स सादर केल्या आहेत. इटालियन ऑटो ग्रुप पियाजिओच्या भारतीय उपकंपनीने नवीन वैशिष्ट्यो, डिझाइन अपडेट्स आणि परफॉर्मन्स अपग्रेड्ससह 2025 मॉडेल्स सादर केल्या आहेत. याशिवाय, कंपनीने व्हेस्पा, ओरो आणि आर्टच्या दोन विशेष आवृत्त्या देखील लाँच केल्या आहेत.
व्हेस्पाचे नवीन 2025 मॉडेल डिझाइनच्या बाबतीत त्याच्या मागील मॉडेलसारखेच आहे, परंतु काही कॉस्मेटिक बदलांसह तिचे सादरीकरण करण्यात आले आहे. स्कूटरला 5-इंच टीएफटी डिजिटल डिस्प्ले मिळणार आहे, जो टेक आणि एस टेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि कीलेस इग्निशन सारख्या वैशिष्ट्यांसह येतो. याशिवाय, सर्व मॉडेल्सना आता एलईडी लाइटिंग मिळेल.
कंपनीने 125सीसी आणि 150सीसी या दोन इंजिन पर्यायांसह व्हेस्पा सादर केली आहे. अपडेटेड 125सीसी स्कूटर चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी त्याची एक्स-शोरूम किंमत 1.32 लाख रुपयांपासून सुरू होते, ज्यात टॉप-स्पेक एस टेक व्हेरिएंटसाठी 1.96 लाख रुपयांपर्यंत ग्राहकांना मोजावे लागतात. कंपनीने 150सीसी इंजिन असलेल्या स्कूटरच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत.
2025 व्हेस्पा: कामगिरी नवीन व्हेस्पा स्कूटर अपडेटेड 125सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनची आहे जी 7,100 आरपीएमवर 9.38 एचपी पॉवर आणि 5,600 आरपीएमवर 10.1 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ट्रान्समिशनसाठी सीव्हीटी गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. त्याचवेळी, यात 150 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनचा पर्यायदेखील असेल, जो 7,500 आरपीएमवर 11.4 एचपी पॉवर आणि 6,100 आरपीएमवर 11.66 एनएम टॉर्क जनरेट करतो.