पूरनकडून गेलचा विक्रम मोडित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विंडीजमधील सुरु असलेल्या कॅरेबियन प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात विंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने नवा विक्रम करताना आपल्या देशाचा माजी सलामीचा फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मागे टाकला. वर्षभराच्या क्रिकेट हंगामामध्ये पूरनने सर्वाधिक षटकार नोंदविले आहेत.
या स्पर्धेतील सामन्यात ट्रीनबॅगो नाईट रायडर्स संघाकडून खेळताना पुरनने 43 चेंडूत 9 षटकारांसह 97 धावा झोडपल्या. पूरनच्या या खेळीमुळे ट्रीन बॅगो रायडर्सने हा सामना 44 धावांनी जिंकला. विंडीजचा माजी सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने 2024 च्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात 135 षटकारांचा विक्रम केला होता. पूरनने 139 षटकार नोंदवून गेलचा विक्रम मागे टाकला. ख्रिस गेलने 2012 च्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात 121 षटकार तर 2011 च्या क्रिकेट हंगामात त्याने 116 षटकार ठोकले होते. चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पूरनने टी-20 प्रकारात आतापर्यंत 1844 धावा जमविल्या आहेत. 2022 साली अॅलेक्स हॅलेसने 1946 धावा तर पाकच्या मोहम्मद रिझवानने 2021 साली 2036 धावा जमविल्या होत्या.