For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशन दुकानात किड सदृश्य निकृष्ट दर्जाचा तांदूळ

12:07 PM Dec 30, 2023 IST | अनुजा कुडतरकर
रेशन दुकानात किड सदृश्य निकृष्ट दर्जाचा तांदूळ
Advertisement

वितरण त्वरित थांबवा ; फुकेरी ग्रा.पं. सदस्या जोत्सना आईर यांची मागणी

Advertisement

ओटवणे |  प्रतिनिधी
तळकट येथील शासकीय रेशन दुकानातून पंचक्रोशीत किड सदृश्य निकृष्ट दर्जाचा तांदुळ वितरीत होत असुन काही रेशन ग्राहकांनी हा निकृष्ट दर्जाचा तांदुळ स्विकारलाच नाही. त्यामुळे सामान्य, गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावा. तसेच या निकृष्ट दर्जाच्या तांदूळ प्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फुकेरी ग्रामपंचायत सदस्या जोत्सना शंभा आईर यानी केली आहे.तळकट विकास सोसायटी संचलित शासकीय रेशन दुकानातून तळकट, कुंभवडे, झोळंबे, भेकुर्ली, खडपडे या गावातील रेशन ग्राहकांना धान्य वितरीत केले जाते. सद्या वितरीत केल्या जाणाऱ्या किड सदृश्य निकृष्ट दर्जाच्या तांदुळाबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी असल्याचे सौ. जोत्सना आईर यांनी सांगितले. पुरवठा विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रेशन दुकानांमध्ये वितरीत होणारा तांदूळ हा निकृष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये असा तांदूळ का जमा करून घेण्यात आला? असा सवाल जोत्सना शंभा आईर यांनी करत, हा तांदूळ जिल्ह्यातील ग्रामीण गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या माथी मारण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

सामान्य, गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवण्यासाठी या निकृष्ट तांदळाचे वितरण त्वरित थांबवण्यात यावे, व या तक्रारीच्या आधारावर चौकशी समिती नेमण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील गोदामामध्ये जमा तांदुळाची तपासणी करून संबधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी. अशी जोत्सना शंभा आईर यांची मागणी असुन प्रत्येक गावचे सरपंच, लोकप्रतिनिधी, सामजिक कार्यकर्ते यांनी या निकृष्ट व भेसळयुक्त दर्जाच्या तांदळाचे वितरण गावोगावी रोखावे व गोरगरीब जनतेला न्याय द्यावा तसेच रेशनदुकान धारकांनी असा निकृष्ट दर्जाचा तांदुळ स्विकारू नये असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.